टाकीचे घाव सोसल्या शिवाय देव पण येत नाही , हे शाळेत असताना नेहमीच ऐकत आले पण याचा अनुभव आजकाल चांगलाच यायला आहे.
जे मनाला भिडेल ते ....
जे मनाला भिडले ते लिहिण्याचा हा प्रयत्न . कोण किती वाचेल हे माहित नाही , पण माझ्या मनात येऊन गेलेला विचार मी लिहून काढला हे अधिक महत्वाचे....
Sunday, May 13, 2012
Saturday, February 11, 2012
इडली, ऑर्किड आणि मी ....
आपल्या वाचनात तसं बरंच काही येत पण लक्षात काही ठराविकच राहत किंबहुना ठेवावसं वाटत. हल्लीच मी वाचलेलं पुस्तक म्हणजे श्री. विठ्ठल कामत लिखित इडली, ऑर्किड आणि मी . अप्रतिम पुस्तक.
| प्रतिक्रिया : |
Friday, January 13, 2012
भ्रमण ध्वनी सुरक्षितता (Mobile safty)
माणसाच्या प्रगतीला सुरुवात झाली तेव्हाच कुठे तरी त्याच्या अधोगतीला पण सुरुवात झाली. पण थोडी काळजी घेतली तर ही अधोगती नक्कीच रोखू शकतो निदान तिची तीव्रता तरी कमी करू शकतो. भ्रमण ध्वनी (Mobile) हा त्यातलाच एक भाग , जीवनाच्या मुलभूत गरजां मध्ये त्याची पण गणना होतेच. त्याचे फायदे तर आपण अनुभवतोच पण त्याबरोबर खूप सारे तोटे पण , पण थोडी काळजी घेऊन त्याच्या वापरणे होणारे भविष्यातील संभाव्य त्रास कमी करू शकतो.
| प्रतिक्रिया : |
Sunday, November 6, 2011
Saturday, October 1, 2011
गणेशोत्सव आणि आपण ...
गणेशोत्सव , माझ्या आणि तुमच्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा सण. गणपतीचे ते सुंदर रूप, तो फुलांचा सुगंध, त्याची आरास, उदबत्ती, धुपाचा तो दरवळलेला सुगंध , घरातल्या बायकांनी राबून केलेले ते गोड-धोड पदार्थ आणि गणपतीची ती सुमधुर गाणी .श्री. अजित कडकडे, श्री. सुरेश वाडकर , श्री. आनंद शिंदे यांच्या आर्त आवाजाने समृद्ध झालेली ती गाणी ऐकण्यात मन खरच तल्लीन होऊन जात.
| प्रतिक्रिया : |
Saturday, September 17, 2011
Thursday, August 18, 2011
दुसरा स्वातंत्र लढा ....
शाळेत असताना आपल्या देशाच्या स्वातंत्र लढ्याचा रक्तरंजित इतिहास वाचून नेहमीच वाटायचं यात आपल्याला पण कुठेतरी खारीचा वाटा घेता आला असता तर खरच खूप बरं झालं असत. मला वाटत आता श्री. अण्णा हजारयानी सुरु केलेल्या या दुसऱ्या स्वातंत्र लढ्यात माझी ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल. फरक एवढाच की पूर्वीचा लढा परक्या (इंग्रज) विरुद्ध होता आताचा लढा आपल्याच माणसां विरुद्ध आहे.
आताचा हा लढा म्हणजे नेमक काय, कशा साठी हे सगळं आपल्याला माहित असण आवश्यक आहे. ती एकत्रित मिळावी म्हणून हा प्रयत्न जेणे करून प्रत्येकाला या लढयात आपल्या कुवती , वेळे प्रमाणे या लढयात भाग घ्यायला अधिक मदत होईल.
आताचा हा लढा म्हणजे नेमक काय, कशा साठी हे सगळं आपल्याला माहित असण आवश्यक आहे. ती एकत्रित मिळावी म्हणून हा प्रयत्न जेणे करून प्रत्येकाला या लढयात आपल्या कुवती , वेळे प्रमाणे या लढयात भाग घ्यायला अधिक मदत होईल.
| प्रतिक्रिया : |
Subscribe to:
Posts (Atom)


